Advertisement

लक्ष्मण हाकेंच्या कारवर नगरमध्ये हल्ला

प्रजापत्र | Saturday, 27/09/2025
बातमी शेअर करा

नगर : ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची    घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली आहे. 

    आज शनिवार (दि.२७) रोजी सकाळी लक्ष्मण हाके हे दैत्य नांदूर ता. पाथर्डी येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, काचा फोडण्यात आल्या आहेत. सुदैवाने हाके यांना शारीरिक इजा झाली नसल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे. हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Advertisement

Advertisement