Advertisement

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना सरकारकडून भाऊबीज भेट!

प्रजापत्र | Friday, 26/09/2025
बातमी शेअर करा

मुंबई: राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत मानधन तत्वावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये देण्याचा निर्णय महिला आणि बालविकास विभागाने घेतला आहे. त्यासाठी विभागाने ४० कोटी ६१ लाख ३० हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

        अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. या निर्णयाचा लाभ राज्यातील १ लाख १० हजाराहून अधिक अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना होणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्तांनी भाऊबीज भेट तात्काळ अदा करण्याबाबत कार्यवाही करावी, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.या योजनेसाठीचा निधी एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित कर्मचाऱ्यांना वितरित केला जाणार आहे. जिल्हास्तरीय अधिकारी, प्रकल्प अधिकारी, यांच्या देखरेखीखाली लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे.

Advertisement

Advertisement