धाराशिव -स्वतः काही करयचं नाही आणि दुसऱ्यांना बोट दाखवायची ही संजय राऊत यांची जुनी पद्धत आहे सकाळी सकाळी कुठलातरी भोंगा वाजवायचा आणि दिवसभर त्याच्या प्रतिक्रिया घ्यायच्या हे योग्य नाही. जीव धोक्यात घालून मी आणि एकनाथ शिंदे त्या शेतकऱ्यांना भेटायला गेले.त्यावर सुद्धा तुम्ही राजकारण करता असे राजकारण करणे योग्य नाही राजकारण करताना काही तरी सहिष्णूता बाळगणे गरजेचे आहे तेंव्हा सकाळचा भोंगा वाजवताना चांगल्या कामाची स्तुती करायला संजय राऊत यांनी शिकावी असा सल्ला परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी राऊत यांना दिला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन तथा धाराशिव पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी अतिवृष्टी झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा तालुक्यातील काही गावात जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती.काल संजय राऊत यांनी वस्तू वाटपाच्या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्या फोटोवरून टीका केली होती त्याला प्रती उत्तर म्हणून आज सरनाईक यांनी एक. व्हिडिओ व जुने फोटो व्हाईरल करत संजय राऊत यांचा खरफूस समाचार घेतला आहे.
या व्हिडिओमध्ये काल मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरीब जनतेला जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या त्याच्यावर त्यांनी बोट ठेवलं मला सांगावं त्यांनी आजपर्यंत तुमचे फोटो लावत होतो ते चालत होते का?
एका दिवसात अडीच हजार लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटप केल्या तर त्यात अडचण काय? आजपर्यंत तुमचे मोठमोठे फोटो लावायचो तुमची नावं टाकायचो त्यावेळी तुमचा आक्षेप नव्हता आजपर्यंत तुम्ही कोणाला बिस्कीटाचे तरी पॉकेट दिले आहे का ? गोर गरीब जनता राहूद्या तुमच्या बाजूला असणारे तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत करनारे, ज्यांनी तुमच्यासाठी जीवाचे रान केले अशा शिवसैनिकासाठी तरी तुम्ही काय केले का ? मला तरी आठवत नाही तुम्ही मदत केलेली.या रंजल्या गांजल्या गरीब शेतकऱ्यांना सगळी कडून मदत मिळणे गरजेचे असताना अशावेळी असं बोट ठेवणं योग्य नसल्याचं प्रताप सरनाईक यांनी म्हटल आहे.
जे या संकटकाळी मदत करत आहेत त्यांच्यावर संजय राऊत यांनी अशा पद्धतीने आक्षेप घेणं योग्य नाही याचे तरी त्यांनी राजकारण करू नये ज्याज्यावेळी राज्यात देशात संकटे आली पूर आला अवकाळी पाऊस झाला त्यात्यावेळी आपले प्रवासी श्रीनगर अथवा नेपाळमध्ये अडकलेले असू द्या त्याना सोडवण्याचा त्यांना मदत करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला असेल तर एकमेव एकनाथ शिंदे यांनी ते फक्त बोलत नाहीत.ते तुमच्या सारखा सकाळी भोंगा वाजवत नाहीत ते स्वतः जागेवर जातात मदत करतात मेहनत करतात सर्वसामान्य लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करतात काल देखील पोलिसांनी सांगितलं होत की तुम्ही बोटीतून जाऊ नका बोट उलटू शकते काही तरी चुकीचं घडू शकते तरी सुद्धा चाळीस पन्नास घरं माझे शेतकरी पाण्यात अडकलेत त्यांना वाचावायचं आहे त्यांची परिस्थिती पाहायची आहे आहे असे म्हणत एकनाथ शिंदे त्या शेतकऱ्यांना भेटायला गेले.
त्यावर सुद्धा तुम्ही राजकारण करता असे राजकारण करणे योग्य नाही राजकारण करताना काही तरी सहिष्णूता बाळगणे गरजेचे आहे.तेंव्हा सकाळचा भोंगा वाजवताना चांगल्या कामाची स्तुती करायला संजय राऊत यांनी शिकावी असा सल्ला परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी राऊत यांना दिला आहे. पूर्वी पण असेच फोटो लावून मदत केली जात होती.. प्रताप सरनाईक