Advertisement

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर!

प्रजापत्र | Thursday, 11/09/2025
बातमी शेअर करा

मुंबई दि.११(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. त्यांनी महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू असल्याचे देखील एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

      मंत्री तटकरे यांनी आज (दि.११) एक्स पोस्टवरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी रुपये १ हजार ५०० (१५०० रुपये) वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज गुरुवार (दि.११) पासून सुरुवात होत असल्याचे म्हटले आहे.महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित होणार आहे, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.

 

Advertisement

Advertisement