कडा दि.५ (वार्ताहार) : बीड (Beed) ते अहिल्यानगर राज्य महामार्गावरील घाटपिंपरी येथे तरूणाचा (Accident) दुचाकीवरील ताबा सुटल्याने रोडलगत असलेल्या विद्युत खांबावर दुचाकी धडकली. यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना गुरूवार (दि.४) रात्री ११ च्या सुमारास घडली.
आष्टी (Ashti) तालुक्यातील घाटपिंपरी येथील राहूल अशोक कोकरे (वय.२६) हा धामणगावहून गुरूवारी रात्री दुचाकीवरून गावाकडे निघाला होता. गावाजवळ येताच एका वळणार दुचाकीवरील ताबा सुटल्याने रोडलगत असलेल्या विद्युत खांबावर दुचाकी धडकली. या (Accident) अपघातात त्याचा जागीच मृत्यु झाला. धामणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डाॅ.पूजा रणवीर यांनी शवविच्छेदन केले. अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार सोपान येवले, होमगार्ड तुषार वामन यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.