नेकनूर दि.५ (वार्ताहार): नेकनूर स्त्री रुग्णालयात नुकतीच गर्भाशयाची दुर्बीण (हॅस्टेरोस्कोपी/लॅप्रोस्कोपी) द्वारे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया नेकनुर स्त्री रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक हुबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.सुमित मसुरे व त्यांच्या टिमने केली आहे .
ग्रामीण भागात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत, त्यांनी महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.डॉ. मसुरे यांचे आधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्यामुळे अनेक महिलांना आता स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार मिळणार आहेत.डॉ.सुमित मसुरे यांच्या या स्तुत्य कार्यासाठी सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.नेकनुर स्त्री रुग्णालयामध्ये १२ ते १५ गर्भाशयाची दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत .काही वर्षा पुर्वी डॉ.सुमित मसुरे यांची नेकनूर स्त्री रुग्णालय नियुक्ती करण्यात आली होती. डॉ सुमित हे नेकनूर स्त्री रुग्णालय ला आल्या पासून त्यांनी रुग्णालयात सोनोग्राफी ही सुरू करून गोर गरिब महीला रुग्णांना चांगल्या दर्जाचे उपचार मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक हुबेकर,सुमित मसुरे यांच्या या कार्यबद्दल नेकनूर ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक होत आहे.
चौकट
नेकनुर स्त्री व कुटीर रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक हुबेकर व त्यांच्या टिमने रुग्णालयामध्ये चांगल्या पद्धतीने रुग्णांना सेवा देण्याचे काम करीत आहे. येथील रुग्णालयात आलेले रुग्ण रेफर न करता रुग्णालयातच सोनोग्राफी, सिझर, गाठीच्या शस्त्रक्रिया, अपेंडेक्स वर शस्त्रक्रिया त्यानंतर आता दुर्बीणद्वारे ही शस्त्रक्रिया नेकनूरच्या रुग्णालयात होत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे .