Advertisement

गोरेगाव येथे उभारण्यात आलेल्या 'आदिपुरुष'च्या सेटला भीषण आग 

प्रजापत्र | Tuesday, 02/02/2021
बातमी शेअर करा

मुंबई - मंगळवारी मुंबईतील गोरेगाव भागातील एका स्टुडिओच्या भागाला भीषण आग लागली. येेथेच आगामी 'आदिपुरुष' या मेगा बजेट चित्रपटाचा सेट बनवण्यात आला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभाष आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत. ज्या सेटवर हा अपघात घडला त्या ठिकाणी कोणताही मोठा स्टार उपस्थित नव्हता. ताजी माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली.

सेटवर उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ''संपूर्ण सेट लाकूड आणि ताडपत्रीने तयार करण्यात आला होता. आगीची घटना घडली तेव्हा आदिपुरुष या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे प्रभास आणि सैफ अली खान घटनास्थळी हजर होते. जवळपास 400 जण यावेळी तेथे उपस्थित होते. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही.''

प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितल्यानुसार, दुपारी सवा चार वाजताच्या सुमारास ही आग लागली आणि ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला जवळजवळ दोन तासांचा कालावधी लागला.

या आगीमुळे आदिपुरुषच्या निर्मात्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. सेटवर लावण्यात आलेला ग्रीन क्रोमा जळून खाक झाला आहे.

आजच सुरु झाले होते शूटिंग

आदिपुरुष या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजच मुंबईत सुरुवात झाली होती. अभिनेता प्रभासने स्वतः सोशल मीडियावर चित्रीकरण सुरु झाल्याचे जाहीर केले होते. प्रभासने चित्रपटाचे एक नवीन पोस्टर शेअर करत 'आदिपुरुष आरंभ' असे कॅप्शन दिले होते.

 

Advertisement

Advertisement