बीड दि.४ (प्रतिनिधी): शहरातील (Beed)बसस्थानकात परळी-पुणे बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने प्रवाशाच्या खिशातून ४३,००० हजार रुपये लंपास केल्याची घटना बुधवार (दि.३) रोजी घडली असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस (Police)ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पनालाल झुंबरलाल बोरा हे ते घरकामासाठी बीड(Beed) येथील आपल्या मेहुण्याकडून उसणे पैसे घेण्यासाठी आले होते. त्यांनी सकाळी १० वावाजता बीड येथे पोहोचून मेहुणे सिद्धार्थ विजय मंडलेचा रा. फुलाईनगर यांच्याकडून ४३,००० हजार रुपये घेतले. बसस्थानकातुन (Crime)दोन वाजता परळी ते पुणे या बसमध्ये (क्र. एमएच १४.०५७०) चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून एकूण ४३,००० हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली असून पनालाल बोरा यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर (Police)पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातमी शेअर करा