बीड-पाटोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सोमनाथ जाधव यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.काल रात्री पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी याबाबत आदेश काढले असून सध्या पाटोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून एपीआय संभाजी तागद यांच्याकडे कारभार सोपविण्यात आला आहे.पाटोदा ठाण्यातील कर्मचाऱ्याला वाळूच्या प्रकरणात २० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्यानंतर सोमनाथ जाधव यांना नियंत्रण कक्षात हलविण्यात आले आहे.
पाटोदा पोलीस ठाण्यातील हवालदार सचिन तांदळे याने वाळूचा हायवा सोडण्यासाठी २० हजारांची लाच स्वीकारली होती.याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केल्यामुळे त्यामुळे पाटोदा पोलीस ठाणे चर्चेत आले होते.अखेर पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सोमनाथ जाधव यांची नियंत्रण कक्षात बदली केल्यामुळे आता त्यांचा पदभार एपीआय संभाजी तागड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी चुकीच्या गोष्टी आपण खपवून घेणार नसल्याचे या कारवाईच्या माध्यमातून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
सोमनाथ जाधव यांची चौकशी ?
पाटोदा पोलीस ठाण्यातील हवालदार सचिन तांदळेला वाळूच्या हायवा प्रकरणात लाच घेताना पकडण्यात आल्यानंतर आता ठाण्याचे प्रभारी असलेल्या सोमनाथ जाधव यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याचे कळते.