Advertisement

शेतकरी आंदोलनाबाबत राकेश टिकैत यांची मोठी घोषणा

प्रजापत्र | Tuesday, 02/02/2021
बातमी शेअर करा

नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचं स्वरुप दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. भारतीय किसान युनिअनने नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आपण देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन मोहीम राबवणार असल्याचं भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केलेलं आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ची घोषणादेखील केली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनासंबंधी एक मोठी घोषणा केली आहे.
 राकेश टिकैत यांनी ‘जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत घऱवापसी नाही’ असा नारा दिला आहे. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही असं मोठं विधान केलं आहे. “हे आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नाही. हे आंदोलन लवकर संपणार नाही,” असं ते म्हणाले आहेत.

Advertisement

Advertisement