Advertisement

 बेपत्ता महिला होमगार्डचा आढळला मृतदेह 

प्रजापत्र | Thursday, 21/08/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२१(प्रतिनिधी): येथील शिवाजीनगर (Beed) पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या बेपत्ता असल्याबाबत तक्रार काल दाखल करण्यात आली होती. आज सकाळी सदर महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.मयत महिला गेवराई येथे होमगार्ड असल्याचे कळते.
    अयोध्या राहुल व्हरकटे (वय-२६) असे मयत महिलेचे नाव आहे. आज सकाळी बीड तालुक्यातील पांगरीच्या पुढे असलेल्या एका नाल्यात अयोध्या यांचा मृतदेह आढळून आला आहे. सध्या घटनास्थळी शिवाजीनगर पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे टीम (Crime news)पोहचली असल्याचे कळते.दरम्यान अयोध्या यांच्या मृत्यु मागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शिवाजीनगर पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

 

एक महिला पोलिसांच्या ताब्यात
मिळालेल्या माहितीनुसार अयोध्या यांच्या मिसिंग बाबत शिवाजीनगर ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. दोन दिवसांपासून त्या बेपत्ता होत्या.वासनवाडीच्या पुढे पांगरी जवळील एका नाल्यात अयोध्या यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे एका महिलेची चौकशी देखील सुरु आहे. या घटनेमागे हत्याचा संशय व्यक्त करण्यात येतं असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Advertisement

Advertisement