Advertisement

क्रेन दुचाकीच्या अपघात एकजण ठार

प्रजापत्र | Saturday, 16/08/2025
बातमी शेअर करा

बीड दि.१६(प्रतिनिधी): शहरातील (Beed)तेलगाव नाका येथे रस्त्याचे काम सुरू असून या अर्घवट सत्यामुळे क्रेन आणि दुचाकीचा अपघात होऊन यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना बार्शी नाका परिसरात आज शनिवार (दि.१६) रोजी (Accident) घडली आहे.  

       शेख बाबू मुनीर (६५ बर्ष) रा. गांधीनगर असे मयत दुचाकीस्वाराचे (Accident)नाव आहे. ते दुचाकी क्र.एम.एच. २३ बी के १९९६ वरून चालले असताना क्रेन क्रमांक एम.एच.२३ एम-८६६८ ची धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील शेख बाबू मुनीर यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात (Beed civil hospital)हलवीला. हा अपघात अर्घवट रत्यामुळे घडला असून, यापूर्वी एकाचा बळी गेला आता हा दुसरा बळी आहे. यामुळे साकेत कंपनी आणि अभियंता यांनी गांभीर्याने लक्ष घालून रत्याचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement