अंबाजोगाई दि.१३(प्रतिनिधी): जुन्या वादातून एका महिलेला कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी पती-पत्नीवर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गवळणबाई श्रीपती माने (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. परळीवेस, अंबाजोगाई) या सोमवार (दि.११) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आपल्या चुलत भावजयीसोबत दारात बोलत बसल्या होत्या. यावेळी त्याच गल्लीत राहणारी आरोपी पदमीणबाई विष्णु जोगदंड (वय ५०) हिने जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली.त्यानंतर तिचा मुलगा किशोर विष्णु जोगदंड (वय ३०) याने संतापाच्या भरात फिर्यादीच्या डाव्या हातावर कोयत्याने वार करून जखमी केले व जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा