धाराशिव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १४ व १५ ऑगस्ट २०२५ रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार असून, या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते धाराशिव जिल्ह्यातील, परंडा, कळंब येथील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहून विकासकामांचा आढावा घेणार आहेत.
१४ ऑगस्ट २०२५ – गुरुवार दुपारी १२.३० वा. – लातूर शहरातून शासकीय वाहनाने खामसावडी, ता. कळंब, जि. धाराशिवकडे प्रस्थानकरून दुपारी १.०० वा. – खामसावडी येथे स्व. दत्तात्रय उर्फ अनिल गुंड यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट देणार आहेत.
दुपारी १.३० वा. – खामसावडीहून परंड्याकडे प्रस्थान. करून,दुपारी २.३० वा. – परंडा येथे दत्ता (अण्णा) साळुंखे, जिल्हाध्यक्ष धाराशिव यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट घेतल्यानंतर सायं. ४.०० वा. – परंडाहून शासकीय वाहनाने धाराशिव शहराकडे येणार असून सायं. ६.४५ वाजता धाराशिव शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट देणार आहेत.
सायं. ७.४५ वा. – कपिलेश्वर मंदिर, महादेव गल्ली, धाराशिव येथे अखंड हरिनाम सप्ताह व न्यानेश्वरी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत व रात्री ८.४५ वा. – धाराशिव शासकीय विश्रामगृहात मुक्काम करणार असल्याचे दौऱ्यात नोंद आहे.
दुसऱ्या दिवशी १५ ऑगस्ट २०२५ – शुक्रवार
सकाळी ८.४५ वा. – शासकीय विश्रामगृहातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान करून
सकाळी ८.५५ वा. – जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन व सकाळी ९.०० वा. – भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात “ध्वजारोहण” करणार आहेत.
सकाळी १०.०० वा. – धाराशिव जिल्हा वार्षिक नियोजन मंडळाची बैठक येथील नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून सकाळी ११.०० वा. – तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सव २०२५ च्या संदर्भात आढावा बैठकही नियोजन भवन येथेच घेणार आहेत.
सकाळी ११.३० वा. – धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की कंपनीच्या प्रतिनिधींशी बैठक नियोजन भवन येथे होणार आहे दुपारी १२.०० वा. – मराठा समाज भवन जागा निश्चिती संदर्भात बैठक तसेच दुपारी १२.३० वा. – श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा राबविताना विस्थापित पुजाऱ्यांना जागा निश्चितीबाबत आढावा बैठक नियोजन भवन येथेच होणार आहे त्यानंतर दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातून शासकीय विश्रामगृह, सोलापूरकडे प्रस्थान करणार आहेत.
या दौऱ्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक हे विविध विकासकामांचा आढावा घेणार असून, नागरिकांशी संवाद साधणार आहेत. धार्मिक स्थळांच्या विकास आराखड्यांचे सादरीकरण, नियोजन बैठका, शासकीय महाविद्यालय भेट, सांत्वन भेटी यांसारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांत त्यांची उपस्थिती राहणार आहे.