बीड दि.९ (प्रतिनिधी):जनसुरक्षा विधेयक रद्द झालेच पाहिजे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या सर्व विरोधीपक्षांच्या वतीने आज शनिवार (दि.९) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी उपस्थित आंदोलकांनी भाजप महायुतीच्या सरकारविरूध्द जोरदार घोषणाबाजी केली. सदरील जनसुरक्षा विधेयक नागरीकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या व संविधानातील मुलभूत अधिकारांच्या विरोधी असल्यामुळे ते तात्काळ रद्द करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेश सरचिटनीस दादासाहेब मुंडे, कॉ. अजय बुरांडे, मोहन गुंड, संगमेश्वर आंधळकर, गणेश मस्के, डी. जी. तांदळे, घाडगे सर, रोहिदास जाधव, कॉ. ज्योतीराम हूरकुडे, आम आदमीचे सादेकभाई आदिंसह अनेकांनी सहभाग घेतला.
बातमी शेअर करा