Advertisement

महादेवी हत्ती परत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार- फडणवीस

प्रजापत्र | Tuesday, 05/08/2025
बातमी शेअर करा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी जिनसेन मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत करा या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये जनतेच्या तीव्र जनभावना लक्षात आल्या आहेत. यामुळे राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका दाखल करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सांगितले.

       नांदणी येथून महादेवी हत्ती नेत असताना जमावाकडून दगडफेक झाली. या प्रकरणी पोलिसांनी धरपकड चालवली आहे. या प्रकरणातील संशयितावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी आ.राहुल आवडी यांनी केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्ती संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबई येथे तातडीची बैठक बोलविली होती. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भूमिका मांडली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, धैर्यशील माने, विशाल पाटील हे खासदार, विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, विनय कोरे, अमल महाडीक, विश्‍वजित कदम, राजेंद्र पाटील-यड्रावकर, अशोक माने, राहुल आवाडे हे आमदार ,माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, अपर मुख्य सचिव (वने), प्रधान मुख्य वनसंरक्षक, (वन्यजीव), जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता, भालचंद्र पाटील, सागर शंभुशेटे, आप्पासो भगाटे, सागर पाटील, अ‍ॅड. मनोज पाटील उपस्थित होते.

 
 
 
 

Advertisement

Advertisement