Advertisement

एसटी महामंडळाचे लवकरच अधिकृत यात्री ॲप

प्रजापत्र | Tuesday, 05/08/2025
बातमी शेअर करा

धाराशिव - चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप लवकरच (St bus)एसटी महामंडळ मार्फत सुरू करण्यात येत आहे. मंत्रालयातील दालनामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या ॲग्रीगेटेड पॉलिसीच्या आधीन राहून राज्य शासनाचे यात्री ॲप बनवण्याच्या अंतिम मुद्यावर आज बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रताप सरनाईक,आ.प्रवीण दरेकर, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

        या नवीन शासकीय ॲपला 'छावा यात्री ॲप' हे नाव देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या अंतिम मान्यतेने हे ॲप लवकरच कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जातील.सदर ॲप राज्य शासनाच्या परिवहन विभागाच्या सहकार्याने एसटी महामंडळा मार्फत सुरू करण्यात येईल. भविष्यात एसटी महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करणे व प्रवाशांना एक विश्वासार्ह सेवा उपलब्ध करून देणे हा उद्देश समोर ठेवून हे शासकीय ॲप एसटी महामंडळाने चालवणे योग्य राहील.राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालविण्यासाठी एसटी महामंडळाची प्रवाशाप्रती असलेली निष्ठा आणि वर्षानुवर्षापासूनची विश्वासार्हता उपयोगी पडणार असून उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होणार आहे.एसटी महामंडळातर्फे चालवण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या अधिकृत ॲपद्वारे रोजगाराची संधी मिळणाऱ्या मराठी तरुण- तरुणींना मुंबई बँकेच्या माध्यमातून विशेष आर्थिक पाठबळ देण्यात येईल असे आश्वासन बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले.

Advertisement

Advertisement