Advertisement

आईचा मोबाईल घेऊन देण्यास नकार मुलाची आत्महत्या 

प्रजापत्र | Monday, 04/08/2025
बातमी शेअर करा

  छत्रपती संभाजीनगर : आईने नवीन मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने अकरावीत शिक्षण घेणाऱ्या सोळा वर्षीय विद्यार्थ्याने आईसमोर खवड्या डोंगरावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना तिसगाव येथील खवड्या डोंगर येथे घडली. आई समोर मुलाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

 अथर्व गोपाल तायडे (वय १६, वडगाव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तायडे कुटुंबीय हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील रहिवासी आहे. गोपाल तायडे व पत्नी शितल तायडे यांच्यात वाद झाल्याने हे विभक्त राहतात. अथर्व हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो सध्या शरणपूर येथील दिल्ली पब्लिक स्कूल येथे अकरावीच्या वर्गात शिकतो.अथर्वने आईकडे नवीन मोबाईल घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. आईने मोबाईल घेऊन देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात अथर्व खवड्या डोंगराकडे धावत सुटला. आईने त्याचा पाठलाग केला मात्र तोपर्यंत त्याने खवड्या डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पोटच्या गोळ्याने डोळ्यादेखत जीव गमावल्याने अथर्वच्या आईने घटनास्थळी टाहो फोडला.

 

घटनेमुळे गावात हळहळ
अकरावीत शिकणाऱ्या अथर्वने मोबाईल न दिल्याच्या कारणावरून आईसमोर डोंगरावरून उडी मारून आत्महत्या केली. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement