Advertisement

राजुरीत दारूच्या अड्ड्यांवर छापे

प्रजापत्र | Saturday, 19/07/2025
बातमी शेअर करा

बीड-ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या राजुरी (न) मधील दारूच्या अड्ड्यांवर छापा मारून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाया केल्याचे कळते. 

 


   

पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी अवैध धंद्यावर कठोर करावायांच्या सूचना दिलेल्या असताना राजुरीमध्ये दारूची विक्री जोरात सुरु होती.हातभट्टीचे अड्डे सुरु असल्याचे पोलिसांना कळल्यानंतर पहाटे ५ वाजल्यापासून राजुरीतील सहा ठिकाणी छापा मारण्यात आले.या कारवाईत ४ लाखांच्या देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली असून हातभट्टी दारूचे अड्डे उद्धवस्त करण्यात आल्याचे कळते.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे,स्थानिक गुन्हे शाखेतील आनंद मस्के,नामदेव सानप,दादा सानप,बळीराम राठोड,पठाण,चालक पवार यांचा समावेश होता.
 

Advertisement

Advertisement