नाशिक : हरिहर गडाच्या पर्यटनाहून परत येताना त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे जाण्याच्या मार्गावर मंगळवार (दि.२२) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास दोघा तरुणांना (Accident)भीषण अपघात झाला. बेझे फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटलेली होंडा सिटी कार दुभाजकावर धडकून तीन-चार पलट्या घेत झाडावर आदळली. या अपघातात अंबडमधील ३१ वर्षीय पंकज काळू दातीर आणि ३० वर्षीय अभिषेक ज्ञानेश्वर घुले या (Accident) दोघा जीवलग मित्रांचा जागीच मृत्यु झाला.
अधिक माहिती अशी की, दातीर आणि घुले हे दोघे मित्र मंगळवारी हरिहर गडावर (Accident) पर्यटनासाठी गेले होते. रात्री परतीच्या वाटेवर, त्र्यंबकेश्वर परिसरात काही मित्रांना भेटून ते नाशिकला परत येत होते.बेझे फाट्याजवळ कार आली असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वेगात असलेली कार दुभाजकावर आदळली. यामुळे ती दूर फेकली जाऊन तिने तीन-चार पलट्या खाल्ल्या आणि दीडशे ते दोनशे मीटर घसरत जाऊन ती रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली.
अपघात इतका भीषण होता की, दातीर आणि घुले हे दोघे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना बाहेर काढून रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यु झाला. पंकजच्या मागे पत्नी, मुलगा आणि आई असा परिवार आहे. तर अभिषेक अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि भावंडे आहेत.