बीड-जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असला तरी मृत्युदर मात्र घटण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही.राज्याचा कोरोना मृत्युदर २.५२ टक्के असून तर बीडचा मृत्युदर ३.१७ टक्के आहे.
बीड जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांचा आकडा १७ हजार ८३६ इतका असून ५५४जणांचा मृत्यु झाला आहे.तर १६ हजार ९९० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान बीड येथील एक, शिरूर,पाटोदा, केज, वडवणी, धारूर, गेवराई,माजलगाव येथील कोव्हिड केअर सेंटर व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल बंद करण्यात आले आहेत तर,बीड जिल्हा रुग्णालय, बीड आयटीआय, लोखंडी सावरगाव येथील श्री रुग्णालय, स्वाराती अंबाजोगाई व काही खाजगी रुग्णालये सध्या सुरू आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १२ टक्के आहे.
बातमी शेअर करा