कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता (Kolkata Gangrape) पुन्हा एकदा एका सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. आरजी कार रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार प्रकरणानंतर आता कोलकाता येथील लॉ (Crime)कॉलेजमधील एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.
२५ जूनच्या रात्री कोलकातातील एका लॉ कॉलेजच्या आवारात एका विद्यार्थिनीवर (Crime)बलात्कार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यात दोन विद्यार्थी आणि संस्थेच्या एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. सदर कर्मचारी कॉलेजचा माजी विद्यार्थी असून सध्या तो तृणमूल काँग्रेसचा विद्यार्थी संघटनेचा नेता असल्याचे समजते.मनोजित मिश्रा (३१), जैब अहमद (१९) आणि प्रमित मुखोपाध्याय उर्फ प्रमित मुखर्जी (२०) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. (Kolkata Gangrape)पीडितेच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करुन त्यांना अटक करण्यात आली. २५ जून रोजी संध्याकाळी ७:३० ते १०:५० दरम्यान कॉलेजच्या आवारात ही घटना घडल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, पीडित विद्यार्थिनीची कोलकाता नॅशनल मेडिकल कॉलेज (CNMC) येथे प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या प्रकरणी अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. संशयित आरोपी मनोजित आणि जैब याला २६ जून रोजीच्या संध्याकाळी तालबागन क्रॉसिंग येथील सिद्धार्थ शंकर शिशू रॉय उद्यानाजवळ अटक केली. दोघांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तिसरा संशयित प्रमितला २७ जून रोजी त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. त्याचाही फोनही (Kolkata Gangrape)जप्त करण्यात आला. या प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.