Advertisement

लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

प्रजापत्र | Tuesday, 03/06/2025
बातमी शेअर करा

 मुंबई :महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण(Ladki bahin yojana) योजनेवरुन सध्या नवा वाद निर्माण झाला आहे. लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतल्याचे समोर आले. हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेचे पैसे लाटल्याचे उघड झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेत चूक झाल्याचे म्हटले आहे. अजित पवारांच्या विधानानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा या योजनेवरून महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 

         पत्रकारांशी बोलताना अदिती तटकरे (aditi tatkare) यांनी सांगितले की, लाडक्या बहिणींना आश्वासन देते की, ही योजना बंद होणार नाही. सरकारी काम करणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे जानेवारी महिन्यातच समजले होते. तेव्हाच पैसे थकवले होते. लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत. महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे. ही योजना बंद होणार नाही. मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल, असे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे. 

Advertisement

Advertisement