Advertisement

पंढरपूरात चंद्रभागा दुथडी भरून वाहू लागली

प्रजापत्र | Monday, 26/05/2025
बातमी शेअर करा

पंढरपूर : नीरा व भीमा नदीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात (Monsoon Update) पाऊस झाल्याने चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. सोमवार (दि.२६) दुपारी पंढरीतील दगडी पुल पाण्याखाली गेला असून पुलावरून ३५ ते ४० हजार क्युसेसने पाणी वाहत आहे. नदीपात्रातील मंदिरांना पाण्याने वेढले असून नदी (Pandharpur River) तीरावरील बहुतांश घाटावरील काही पायऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. दरम्यान आपत्ती व्यवस्थापनासाठी पंढरपूर नगरपालिका, महसूल व पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

                                  सध्या उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने पंढरपूर मध्ये दररोज हजारो भाविकांची गर्दी होत आहे. भाविकांनी नदीपात्रात आंघोळीसाठी उतरून जीवितास धोका होऊ नये याकरिता पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने नदीकडेला बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. भाविकांनी खोल पाण्यात अंघोळीसाठी जाऊ नये म्हणून प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

यासाठी प्रशासक(Monsoon Update) तथा उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली(Pandharpur River)  पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा व पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नगरपालिकेची अग्निशमन दल जवान व जीव रक्षक स्वयंसेवक नदीपात्रामध्ये स्पीड बोट द्वारे गस्त घालत होते.यावेळी पंढरपूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी अँड. सुनील वाळुजकर,पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हरसुरे , अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले,आरोग्य अधिकारी तोडकर, अग्निशमन दल यंत्रणा व पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे.

Advertisement

Advertisement