सोलापूर : तीन दिवसांपूर्वी एका निर्दयी बापाने आपल्या पोटच्या ७ वर्षीय मुलीची हत्या करुन, तिला घराशेजारी पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. आता या घटनेत एक मोठा खुलासा झाला आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती(Crime) समोर आली आहे. आरोपी बापाचे आपल्या सासूसोबत अनैतिक संबंध होते, याची वाच्यता कुठे करू नये याच कारणावरुन बापाने मुलीची हत्या केली.
सविस्तर माहिती अशी की, जावयाचे आपल्या सासूसोबत (Solapur Crime)अनैतिक संबंध होते. त्या दोघांना चिमुकलीने नको त्या अवस्थेत पाहिले. याची वाच्चता कुठे करू नये, यासाठी निर्दयी बापाने आधी आपल्या मुलीचा गळा आवळून खून केला अन् नंतर तिचा मृतदेह घराशेजारी पुरला. ही चीड आणणारी ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर गावात घडली आहे. मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थित आढळल्यानंतर गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली होती. पण शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली. गळा दाबून मुलीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले (Crime)होते. ओगसिद्ध कोठे असे आरोपी बापाचे नाव असून, मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात 103(1), 238 नुसार गुन्हा दाखल केला आहे.