बीड (प्रतिनिधी) – ट्रकने दुचाकीला (Beed)पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार झाल्याची दुर्देवी घटना आज (दि.२६)रोजी सकाळी ९ च्या सुमारास मांजरसुंबा उड्डाणपुला जवळील सर्व्हिस रोडवर (Accident)घडली.
सविस्तर माहिती अशी कि,बीड तालुक्यातील(Beed) येळंबघाट येथील बाबूशा रामभाऊ कदम (वय ५३) ह.मु.कृषि कॉलनी, बीड हे आज सकाळी ९ च्या सुमारास माजरसुबा मार्गे येळंबघाटकडे दुचाकी क्रमांक एम.एच.१२. एच.ई. ७०९० ने जात असतांना मांजरसुंबा येथील उड्डाणपुला जवळील सर्व्हिस रोडवर पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात बाबूशा कदम हे गंभीररित्या जखमी झाले. (Accident) त्यांना तात्काळ बीडच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बातमी शेअर करा