Advertisement

विद्युत तार अंगावर पडल्याने बैलाचा मृत्यु  

प्रजापत्र | Sunday, 25/05/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.२५ (प्रतिनिधी): शेतामध्ये मशागतीचे काम सुरू(Beed)असताना शेतातून गेलेल्या वीज कंपनीची तार खाली पडली. या दरम्यान विद्युतप्रवाह असलेल्या तारेचा बैलाला शॉक लागला. त्यात शेतकर्‍याचा बैल मरण पावल्याची घटना नागापूर खुर्द याठिकाणी घडली.

       याबाबत अधिक माहिती अशी की, यावर्षी मशागतीच्या काळामध्ये पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकर्‍यांनी शेतातील मशागत करण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. पावसाने उघडीप दिली, की शेतकरी घाईगडबडीने शेतातील पेरणीपुर्व मशागत सुरू करत आहेत.(Beed) बीडपासून जवळच असलेल्या नागापूर बुद्रुक येथील शेतामध्ये अशोक शंकर गायकवाड हे शेतीची मशागत करत होते. या दरम्यान शेतातून विज कंपनीची विद्युत प्रवाह वाहणारी तार बैलाच्या अंगावर पडली. विजेचा शॉक लागून बैल जागीच ठार झाला. त्यात शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

Advertisement

Advertisement