Advertisement

  टॉवेल कारखान्यास भीषण आग तीन कामगारांचा मृत्यु

प्रजापत्र | Sunday, 18/05/2025
बातमी शेअर करा

 सोलापूर : सोलापुरात अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये एका (towel factory) टॉवेल कारखान्यास अचानकपणे लागलेल्या (Fire)आगीत तीन कामगार होरपळून मरण पावले. यात एक महिला आहे. तर कारखाना मालकाच्या कुटुंबीयांसह आणखी पाच ते सहाजण कारखान्यात अडकल्याची (Fire)भीती व्यक्त होत आहे. ही आग एवढी भीषण आहे की अग्निशमन दलास आग नियंत्रणात आणायला दहा तासांनंतरही यश आले नाही.‌ आगीचे निश्चित कारणही समजू शकले नाही.

       अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये सेंट्रल टेक्सटाइल नावाच्या (towel factory)टॉवेल कारखान्यात (Fire)पहाटे पावणेचारच्या सुमारास अचानकपणे आग लागली आणि पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. यात बागवान कुटुंबीयांशी संबंधित एका महिलेसह तीन कामगारांचा होरपळून जागीच मृत्यु झाला. या दुर्घटनेत कारखान्याच्या मालकाचे कुटुंबीयही अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. हाजी उस्मान मन्सुरी यांच्या मालकीच्या सेंट्रल (Fire)टेक्सटाइल कारखान्यात सुमारे २२५ कामगार काम करतात.उत्पादित टॉवेलसह त्यासाठी लागणारे सूत, दोरी, रसायन, कागदी पुठ्ठे आदी माल कारखान्यात मोठ्या प्रमाणावर होता.‌ कारखान्याचे मालक हाजी उस्मान मन्सुरी हे(towel factory) कुटुंबीयांसह कारखाना इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहतात.‌ आगीत मालकासह मन्सुरी कुटुंबातील पाच ते सहाजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन यंत्रणेकडून नेटाने प्रयत्न सुरू होते.‌ या कुटुंबीयांचा आवाज दुपारी उशिरापर्यंत बाहेर ऐकू येत होता.‌

Advertisement

Advertisement