Advertisement

दिल्लीत 'आप'ला मोठा झटका, पक्षात फूट?

प्रजापत्र | Saturday, 17/05/2025
बातमी शेअर करा

दिल्ली : विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या झटक्यातून (Aap)आम आदमी पक्ष (आप) अजुनही सावरला नाही. विधानसभेतला पराभवानंतर आणखी एक मोठा धक्का पक्षाला बसला आहे. एक दोन नव्हे तर तब्बल पंधरा नगरसेवकांनी पक्षाचा राजीनाम देत स्वतंत्र आघाडी उभारली आहे.

       नगरसेवक हेमचंद्र गोयल यांच्या नेतृत्वाखाली सुमारे १५ नगरसेवकांची (Aap)शनिवारी बैठक झाली, ज्यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या सर्व नगरसेवकांनी 'आप' पक्षाचा राजीनामा देत तिसरी आघाडी तयार करण्याचा निर्णय घेतला. या नव्या गटाचे नेतृत्व माजी सभागृह नेते मुकेश गोयल यांच्याकडेच असणार आहे. या १५ नगरसेवकांनी आपल्या आघाडीला 'इंद्रप्रस्थ विकास पार्टी' असे नाव दिले आहे.
 

Advertisement

Advertisement