Advertisement

बसमध्ये चढताना महिलेचे दागिने लांबविले 

प्रजापत्र | Saturday, 17/05/2025
बातमी शेअर करा

 गेवराई दि.१७ (प्रतिनिधी ): पुणे येथून (Beed)कार्यक्रमानिमित्त गावी आलेले दाम्पत्य सिरसदेवी येथून रांजनगाव येथे जात असताना सिरसदेवी फाट्यावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले तब्बल १० तोळे सोने चोरल्याची घटना (दि.१५) गुरुवार रोजी घडली असून (Crime)पाच लाखांचा ऐवज लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

          गेवराई तालुक्यातील रुई येथील उषा रखमाजी कादगे या गेल्या काही वर्षांपासून रांजनगाव (ता. शिरूर) येथे राहतात दोन दिवसांपूर्वी त्यांच्या मूळ गावी कार्यक्रमानिमित्त आल्या होत्या दि.१५ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास कादगे दाम्पत्य पुणे येथे जाण्यासाठी सिरसदेवी फाटा या ठिकाणी बसची वाट बघत थांबले . त्या दरम्यान माजलगाव ते मानगाव जाणारी बस आली, बसमध्ये चढताना पर्सला जोरदार झटका लागला. परंतु उषा यांनी गर्दीमुळे दुर्लक्ष केले. हि बस शिरूर टोल प्लाझा ता. शिरूर जि. पुणे इथे आली तेव्हा त्यांनी पर्स उघडून पाहिली तरआतमधील साडेचार तोळ्याचे मोठ्या पट्ट्याचे गंठण, दोन तोळ्याचे झुंबर, दोन सोनसाखळ्या, झुंबर वेल, पाच सोन्याच्या अंगठ्या, कानातील सहा बाळ्या, सोन्याच्या दोन नथ असा एकूण दहा तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ५,२०,१८० लाखांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपस पोलीस करत आहेत. 

 

Advertisement

Advertisement