Advertisement

वाळूची वाहतूक करताना पकडले दोन ट्रॅक्टर

प्रजापत्र | Sunday, 11/05/2025
बातमी शेअर करा

माजलगाव दि.११(प्रतिनिधी): तालुक्यातील (Majalgaon) काळेगावथडी शिवारात गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती (Majalgaon gramin police)माजलगाव ग्रामीण पोलिसांना मिळताच (दि.१०) शनिवार रोजी सकाळी ९ च्या सुमारास दोन ट्रॅक्टरवर कारवाई करत १८,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

     माजलगाव तालुक्यातील काळेगावथडी शिवारात गोदावरी (Majalgaon gramin police)नदीपात्रातून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक करताना परमेश्वर बाबुराव वजीर रा.हिवरा बु. ता.माजलगाव ,विजय राजू साळवे रा.शेलगावथडी ता.माजलगाव,अशोक नारायण कदम रा.टाकरवन,साधू महादेव फुलवरे रा.पंचशीलनगर माजलगाव या चार जणांवर माजलगाव ग्रामीण पोलिसांनी (दि.१०) शनिवार रोजी सकाळी ९ च्या सुमारास कारवाई केली.(Beed)यात लाल रंगाचे अर्जुन ट्रॅक्टर अंदाजे किंमत ९,००,००० रुपये,निळ्या रंगाची ट्रॉली अंदाजे किंमत १,००,००० रुपये व त्यामध्ये एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ६,००० रुपये,२)जॉईन डिअर कंपनीचे ट्रॅक्टर अंदाजे किंमत ७,००,००० रुपये व लाल रंगाची ट्रॉली अंदाजे किंमत १,००,००० रुपये व त्यामध्ये एक ब्रास वाळू अंदाजे किंमत ६,००० रुपये असा एकूण १८,१२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास (Majalgaon gramin police)माजलगाव ग्रामीण पोलिस करत आहेत. 

Advertisement

Advertisement