अहिल्यानगर (Ahilyanagar Crime) जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे गुरुवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. या अत्यंत धक्कादायक घटनेने संपूर्ण (Old Woman Killed) परिसर हादरून गेला आहे. किसनाबाई छगन मैदड (वय 75) या वृद्ध महिलेची हत्या करून, गुन्हेगाराने तिचा मृतदेह घरातच जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे. हत्येचे कारण अद्याप उघडकीस आलेले नाही, मात्र या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ (Crime News) उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागीय पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, पाथर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक निरीक्षक (Ahilyanagar News) नितीन दराडे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, हरीश भोये, पोलीस कॉन्स्टेबल भगवान टकले, अमोल बुचकुल, संभाजी कुसळकर, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक देवमन वाघ आणि त्यांची टीम, फॉरेन्सिक पथकाचे ठसे तज्ज्ञ रशीद शेख, श्वानपथकासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
नेमक काय घडलं ?
घटनास्थळी तपास करत असताना, मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी प्राथमिक तपासात असा अंदाज व्यक्त केला आहे की, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गुन्हेगाराने मृतदेह घरातच जाळून टाकला. दरम्यान यामध्ये एक धक्कादायक बाब म्हणजे घरात कोणत्याही प्रकारची चोरी झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे ही हत्या केवळ चोरीसाठी झाली नसल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ही हत्या कोणी केली? हत्या करण्यामागे नेमके कारण कोणते आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत. परंतु या घटनेने अहिल्यानगर जिल्हा हादरला आहे. नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण असल्याची माहिती मिळतेय. पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.