बीड दि.8 (प्रतिनिधी)-वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नीटची परीक्षा यंदा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत अवघड गेली.परिणामी यावेळी वैद्यकीय प्रवेशासाठी मागील वर्षाच्या तुलनेत गुणांचे जे समीकरण परीक्षेपूर्वी अपेक्षित मानले जात होते त्यात मोठा बदल पाहायला मिळणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत मेरिट वाढण्याऐवजी घसरणार असल्यामुळे ५०० गुणांवर एमबीबीएसचा वैद्यकीय प्रवेशासाठी आशा निर्माण झाल्या असल्याची माहिती हायटेक एज्युकेशनचे संचालक डॉ.सुनील राऊत यांनी दिली.१० ते १४ जूनच्या दरम्यान नीटचा निकाल लागण्याचा अंदाज असून यावेळी नीटचा निकाल घसरणार असल्याने वैद्यकीय प्रवेशाचे सर्व समीकरणे देखील बदलणार असल्याचे मानले जाते.
बीडमध्ये वैद्यकीय क्षेत्रात मागच्या काही वर्षांपासून विद्यार्थी आणि पालकांना अचूक मार्गदर्शन करणारे केंद्र म्हणून ‘हायटेक’ एज्युकेशनने नावलौकिक मिळविला आहे.या मार्गदर्शन केंद्रामुळे जवळपास आतापर्यंत १ हजारच्या पुढे विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.महाराष्ट्र,इतर राज्य आणि विदेशात देखील अनेकांना नाममात्र शुल्क घेऊन प्रवेश करून देण्याचा पारंडा अनिल राऊत आणि डॉ.सुनील राऊत रांनी पाडला. यावर्षी नीटचा पेपर संपल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे ती या परीक्षेची.यंदाचा पेपर विद्यार्थ्यांना घाम फोडणार होता.त्यामुळे परीक्षेपूर्वी मेरिटच्या बाबतीत जे अंदाज लावले जात होते ते सपशेल पणे फोल ठरणार असून निकालानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.पण गतवर्षीच्या तुलनेत यावेळी वैद्यकीय प्रवेशासासाठी १०० ते १५० मार्क कमी आले तरी एमबीबीएस आणि बीएएमएससाठी प्रवेश मिळणे शक्य असल्याचा अंदाज हायटेकच्या वतीने वर्तविण्यात आला आहे.मागील वर्षी खुल्या प्रवर्गासाठी ६३८ मार्कला एमबीबीएससाठी शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता.यावर्षी ५०० ते ५१० मार्क आल्यानंतर देखील शासकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.तर बीएएमएसच्या शासकीय महाविद्यालयातील प्रवेशसासाठी खुल्या वर्गातून ५२० मार्कला प्रवेश मिळाल्यानंतर आता ४०० मार्क आल्यावर ही प्रवेश मिळण्याचा अंदाज आहे. यासोबतच खाजगी महाविद्यालयाच्या बाबतीत ६०० वर गतवर्षी मेरिट असताना आता ४५० ते ४६० मार्क पुरेसे मानले जात आहेत.तर बीएमएससाठी ३०७ वर मागच्या वर्षी शेवटचा राउंड संपल्यानंतर यंदा २८० मार्कपर्यंत खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो अशी माहिती डॉ.सुनील राऊत यांनी दिली. दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी रिपीट केले आहे त्यांना यावर्षी मार्क वाढवून येण्याचे प्रमाण नगण्य राहणार असल्याच्या देखील चर्चा असून निकालानंतर प्रवेशाचे समीकरणे खऱ्या अर्थाने आता समोर येतील.
गुणांपेक्षा ऑल इंडिया रँक महत्वाची
वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया यावर्षी पूर्णपणे आश्चर्यकारक राहणार आहे.कारण पेपर एवढा अवघड असेल याचा अंदाज विद्यार्थी,पालक आणि शिक्षक कोणालाही नव्हता.त्यामुळे वैद्यकीय प्रवेशाचे समीकरणे बदलणार असून गतवर्षीपेक्षा १०० ते १५० मार्कच्या तफावताने एमबीबीएस आणि बीएएमएससाठी प्रवेश मिळण्याची शक्यता आहे.खाजगी महाविद्यालयासाठी देखील हीच परिस्थिती राहणार असून विद्यार्थी आणि पालकांनी मार्क पाहण्यापेक्षा ऑल इंडिया रँक पाहणे महत्वाचे राहणार आहे.कारण परीक्षा अत्यंत अवघड गेल्यामुळे यावर्षी सर्वत्र समीकरणे बदलणार असून मार्कपेक्षा ऑल इंडियाच्या रँकचा विचार करणे क्रमप्राप्त राहिलं.त्यावरच पुढील प्रक्रिया ठरणार आहे.
-डॉ.सुनील राऊत (हायटेक संचालक)