Advertisement

भरदुपारी फोडले दुकान  

प्रजापत्र | Thursday, 08/05/2025
बातमी शेअर करा

केज दि.८(प्रतिनिधी): तालुक्यातील(Kaij) एकुरका येथील कृषी सेवा केंद्र,फिनो बँक सेवा केंद्र अज्ञात चोरटयांनी फोडल्याची घटना (दि.५) सोमवार रोजी घडली असून चोरटयांनी ४७,९०० रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात (Kaij police)गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

        जिल्हाभरात चोरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. (Kaij police)अश्यातच केज तालुक्यातील एकुरका येथील सुनील रामहरी केदार (वय २४) यांचे गावातच  कृषी सेवा केंद्र व फिनो बँक सेवा केंद्र आहे.गावातील सप्ताहाच्या पंगतीत दुपारी वाढण्यासाठी गेले असता कॅश काउंटरचे लॉक तोडून अज्ञात चोरटयांनी ४७,९०० रुपयांचा  ऐवज (दि.५) सोमवार रोजी ०१ ते ०२ च्या दरम्यान भर दुपारी लंपास केल्याची घटना घडली असून सुनील केदार(Crime news) यांनी (दि.७) बुधवार रोजी दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.  

Advertisement

Advertisement