गेवराई दि.६(प्रतिनिधी):शहरातील (Georai) कँब्रीज शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ट्रॅक्टरच्या साहाय्याने अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती गेवराई पोलिसांना मिळताच (दि.५) सोमवार रोजी कारवाई करत ६,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गेवराई शहरातील (Georai) कँब्रीज शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरून अवैध वाळूची वाहतूक करताना सौरभ भाऊसाहेब माखले (वय २५) रा.मिरगाव ता.गेवराई जि. बीड याच्यावर गेवराई पोलिसांनी (दि.५) सोमवार रोजी कारवाई केली. यात एक लाल रंगाचे स्वराज ७४४ एक्स टी एन कंपनीचे विना नंबरचे ट्रॅक्टर व पिवळ्या रंगाची ट्रॉली अंदाजे किंमत ६,००,०००,व ट्रॉलीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळू किंमत ६,००० रुपये असा एकूण ६,०६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील (Georai police) तपास गेवराई पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा