Advertisement

१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली उद्या होणार जाहीर

प्रजापत्र | Sunday, 04/05/2025
बातमी शेअर करा

मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (HSC Result) सोमवारी ५ मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

        या वर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षा ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आल्या होत्या. त्यासाठीची प्रात्यक्षिक परीक्षा त्यापूर्वी २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ दरम्यान घेण्यात आल्या होत्या. परीक्षेसाठी  सुमारे ८.१ लाख विद्यार्थी, ६.९ लाख विद्यार्थिनी (HSC Result)आणि ३७ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक (Result)मंडळाकडून उद्या दुपारी एक वाजता बारावीचा (HSC Result)निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अधिकृत संकेतस्थळासह विविध संकेतस्थळांवर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा योग्य नोंदणी क्रमांक किंवा रोल नं व पासवर्ड भरणे आवश्यक राहणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या निकालाच्या अधिकृत सूचनेनुसार बारावी बोर्डाचा निकाल mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल तपासता येणार आहे.

 

 

या संकेतस्थळांवर तपासू शकता निकाल

mahahsscboard.in

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

hsc.mahresults.org.in
 

Advertisement

Advertisement