मुंबई : अर्थ विभागाकडून मनमानी सुरू आहे. (ladki bahin yojana) माझ्या विभागाचा निधी वर्ग किंवा कमी करता येत नाही. निधी वर्ग करण्यात आला असेल, तर मला त्याबाबत माहिती नाही. मुख्यमंत्र्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी घालणार आहे. अशा गोष्टी करणे कायदेशीर नाही. असे करणे चुकीचे आहे. अर्थ खाते आपल्याला वाटते, तेच खरे असे वागत आहे. याला माझा विरोध आहे. सहन करायची एक मर्यादा असते. यापेक्षाही तुम्ही जास्त करत असाल, तर मला वाटते की, सरळ सर्वच निधी कट करून टाका, या शब्दांत सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संताप व्यक्त केला. ते पत्रकारांशी बोलत होते.
लाडकी बहीण योजनेचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी (Sanjay Shirsat)विकास खात्याचा निधी वळवण्यात आला आहे. या दोन्ही विभागांचे अनुक्रमे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रुपये महिला आणि बालविकास विभागाकडे वळविण्यात आले आहेत. महिला आणि बालविकास विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केल्याचे समजते. यानंतर आता (Sanjay Shirsat) संजय शिरसाट यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.