जळगाव : २१ व्या शतकातील २५ वर्ष संपत आली तरी (Jalgaon Crime News)आपल्याकडील अनेक भागात अजूनही अनेक बुसरटलेल्या रुढी परंपरा पाळल्या जातात. मासिक पाळीबाबत पाळल्या जाणाऱ्या अशाच विटाळातून एका विवाहितेचा जीव गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील किनोद या गावात गायत्री कोळी या २६ वर्षीय विवाहितेने गुरुवारी गळफास घेऊन जीवन संपलं होतं. मात्र या महिलेची तिची सासू आणि नणंदेने मिळून हत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
अधिक माहितीनुसार गायत्र कोळी ही महिला किनोद या गावात पती,सासू आणि दोन मुलांसोबत वास्तव्यास होती. तिच्या पतीचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. तर गायत्री शिवणकाम करत असे. दरम्यान, (Jalgaon Crime News) गुरुवारी दुपारच्या सुमारास गायत्री हिने गळफास घेतल्याची माहिती तिच्या माहेरच्यांना मिळाली त्यानंतर त्यांनी गायत्रीच्या घरी धाव घेतली. मात्र गायत्री हिने जीवन संपवलं नसूत तिची हत्या झाल्याच्या दावा माहेरच्या नातेवाईकांनी केला.याबाबत गायत्री हिचा भाऊ सागर कोळी याने धक्कादायक माहिती दिली. गायत्री हिने मासिक पाळी आली असताना जेवण केलं होतं. मात्र गायत्रीच्या सासूसह इतरांना असं जेवण चालत नव्हतं. त्यावरून कुटुंबामध्ये वाद झाला. (Jalgaon Crime News)हा वाद वाढून अखेर गायत्रीची सासू आणि नणंदेने तिला मारहाण केली. तसेच तिची गळा आवळून हत्या केली. तसेच हत्या केल्यानंतर ही आत्महत्या भासावी यासाठी तिचा मृतदेह गळ्याभोवती साडीचा फास लावून लटकवून ठेवला, असा आरोपही त्याने केला.
ही घटना घडल्यानंतर मृत गायत्री हिचा पती, सासू आणि नणंद फरार झाले आहेत. आता दोषींवर गुन्हा दाखल होईपर्यंत हा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा गायत्री हिच्या नातेवाईकांनी घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.