Advertisement

परळी हादरली पुतण्याने घेतला चुलतीचा जीव

प्रजापत्र | Friday, 02/05/2025
बातमी शेअर करा

परळी दि.२(प्रतिनिधी):दारूसाठी (Beed)पैसे देत नसल्यामुळे पुतण्याने रागाच्या भरात डोक्यावर आणि अंगावर कुर्‍हाडीने सपासप वार करत चुलतीची हत्या केली. त्यानंतर घटनास्थळावर पळ काढला. कावळ्याचीवाडी येथे ही घटना घडली आहे.(Crime news) परिमाला बाबुराव कावळे असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपीचे नाव चंद्रकांत कावळे असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

 

परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथील २५ वर्षीय पुतण्याने ६५ वर्षीय चुलतीचा जीव घेतला. पुतण्याने चुलतीचा डोक्यात कुर्‍हाड घालून खून केला. आरोपी दारूडा पुतण्या चंद्रकांत धुराजी कावळे (वय २५ वर्ष) याने ६५ वर्षीय परिमाला (Parli) बाबुराव कावळे यांच्यावर कुर्‍हाडीने वार करत हत्या केली.आरोपी चंद्रकांत कावळे दारू पिण्यासाठी चुलतीकडे दररोज पैशाची मागणी करत होता. परिमाला कावळे या पुतण्याला कधी कधी पैसे द्यायच्या. पण चंद्रकांत दररोज पैशासाठी तगादा लावायचा, त्रास द्यायचा. यावरून वाद झाला, त्यातूनच हत्याची घटना घडली.
गुरूवारी सायंकाळी सहा वाजता आरोपीने परिमाला यांच्याकडे पैशांची मागणी केली. परिमाला यांच्याकडे पैसे नव्हते. तिने पैसे देण्यास त्याला नकार दिला. त्यामुळे आरोपी चंद्रकात याला राग अनावर आला. रागाच्या भरात चंद्रकांतने घरातील कुर्‍हाडीने (Crime news)चुलतीच्या अंगावर आणि डोक्यावर सपासप वार केले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पुतण्याच्या हल्ल्यात चुलतीचा जागीच मृत्यु झाला. याप्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय पाठवण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपी पुतण्याचा शोध घेतला जात आहे.

Advertisement

Advertisement