Advertisement

सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाताना भीषण अपघात

प्रजापत्र | Tuesday, 29/04/2025
बातमी शेअर करा

नाशिक: सप्तशृंगी गडाच्या (Nashik Accident) दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वाहनाचा (दि.२९) मंगळवार रोजी भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत लहान मुले, महिला आणि जेष्ठ नागरिकांसह सुमारे २७ भाविक गंभीर जखमी झाले आहेत. 

               बुलढाणा जिल्ह्यातून सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांचा पिकअप (pickup)वाहन वणी गडाच्या चढणीत असताना पलटी झाला.अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या अपघातात लहान मुले, महिला आणि जेष्ठ नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व (Police)पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी भाविकांना तत्काळ उपचारासाठी नाशिकच्या (Nashik Accident) जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.घटनास्थळी स्थानिकांनी पलटी झालेल्या (pickup)पिकअपमधून भाविकांना बाहेर काढले. जीवित हानी टळली असली तरी २७ भाविक गंभीर जखमी झाले आहेत.
 

Advertisement

Advertisement