Advertisement

लेक आयएएस झाल्याचा आनंद साजरा करताना वडिलांचा मृत्यु

प्रजापत्र | Monday, 28/04/2025
बातमी शेअर करा

यवतमाळ: नुकताच युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. यात महाराष्ट्रातल्या ९० पेक्षा जास्त जणांनी यश मिळवलंय. यवतमाळमधील मोहिनी खंदारे ही आयएएस झाली. पण तिच्या यशाचा आनंद साजरा करताना वडिलांचा मृत्यु (ias success) झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. आनंदोत्सव सुरू असतानाच वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. प्रल्हाद खंदारे (pralhad khandare)असं मोहिनीच्या वडिलांचं नाव आहे. ते पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी होते.

 

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रल्हाद खंदारे यांची मुलगी मोहिनी हिनं युपीएससीत मोठं यश मिळवलं. ती आयएएस अधिकारी झाली. आनंदोत्सव साजरा करत असतानाच तिच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यु झाला. प्रल्हाद खंदारे (pralhad khandare) यांना रुग्णालयात नेलं होतं पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.मोहिनी खंदारे या सध्या पंचायत समिती बुलढाणा इथं गटशिक्षणाधिकारी (father dies) आहेत. युपीएससीत यश मिळवत आता त्या केंद्रीय प्रशासकीय सेवेत रुजू होतील. मात्र त्याआधीच वडिलांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.मोहिनी प्रल्हाद खंदारे यांनी सुरुवातीला पुण्यात कोचिंग क्लासमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी स्वयंअध्ययन करत यशाला गवसणी घातली. याआधी २०२१ मध्ये एमपीएससीत उत्तीर्ण होऊन उपशिक्षणाधिकारी झाल्या होत्या. तर २०२३ मध्ये बुलढाणा पंचायत समितीत गटशिक्षणाधिकारी पदी नियुक्ती झाली होती.

 

Advertisement

Advertisement