मुंबई : महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki bahin yojana) विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत लाडक्या बहिणींची १५०० रुपयांची असलेली रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याची घोषणा केली होती. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर २१०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले. पण आता महायुतीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
नरहरी झिरवळ म्हणाले, लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ, असे कोणीही म्हटलेले नाही. मला वाटते पंधराशे रुपये ही रक्कम देखील परिपूर्ण आहे. महिला १५०० रुपये मिळाल्यानंतरही खुश आहेत. असे झिरवळ यांनी माध्यमांशी बोलता सांगितले.
नवीन लोकांना मंत्रिमंडळात संधी देण्याबाबत नरहरी झिरवळ यांनी (Ladki bahin yojana)सांगितले की, मंत्रिमंडळात नवीन लोकांना संधी देण्याबाबत त्यांचे चांगले धोरण आहे. माजी मंत्री अनिल पाटील माजी मंत्री छगन भुजबळ यांची देखील मंत्रिमंडळात वर्णी लागावी, अशी आमची इच्छा आहे. अजित पवार यावर निर्णय घेतील. असे झिरवळ म्हणाले.