Advertisement

पिकअप,स्विफ्टचा भीषण अपघात

प्रजापत्र | Sunday, 27/04/2025
बातमी शेअर करा

केज दि.२७ (प्रतिनिधी): पिकअप व कार यांच्यात समोरासमोर जोराची (Accident) धडक होऊन झालेल्या अपघात आठ जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रविवार (दि.२७) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केज-बीड रस्त्यावरील गंगा माऊली साखर कारखाना परिसरात असलेल्या टोल नाक्यापासून काही अंतरावर घडली.

     अपघातात गंभीर जखमी झालेल्या आठ (Kaij)जणांमध्ये चार पुरूष, दोन महिला व एका मुलाचा समावेश आहे. केज शहरापासून काही अंतरावर असलेल्या गंगामाऊली साखर कारखाना परिसरात असलेल्या टोलनाक्याजवळ एक भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार (एमएच-१४/एफसी-२०३८) ही अंबाजोगाईहून बीडच्या दिशेने जात होती.ती कार आणि पुण्याकडून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील त्यांच्या गावाकडे जात असलेल्या पिकअप (एमएच-१४/एचयु-७१४२) यांच्यात (Accident) समोरासमोर जोराची धडक झाली. या भीषण अपघातात पीकअप चालकाच्या बाजूचे टायर तुटून पडले आहे. कार मधून प्रवास (Car Accident)करणारे चौघे व पीकअपमधील दोन महिला व दोन मुले असे एकूण आठजण जखमी झाले आहेत. त्यापैकी आवेज सुभान गवळी यांच्या हाताला व चेहऱ्याला तर  जिजाबाई व्यंकट कानगुटे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने ते (Accident) दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच अलिफ शेख, महम्मद साबेर शेख, अझर शेख व शोभा नाना कानगुटे यांच्यासह दोन मुले असे एकूण आठजण जखमी आहेत. जखमी रुग्णांना केज शहरातील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

Advertisement

Advertisement