बीड दि.२६ (प्रतिनिधी)-येथील कारागृहाचा पदभार तात्पुरत्या स्वरूपात आलेल्या एका वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि महिला शिपाईचे निलंबन करण्यात आले असल्याची चर्चा आहे. .नातलग अथवा रक्ताच्या नात्यापेक्षा इतर लोकांना कैद्यांना भेटू देणे व कारागृहात इतर काही त्रुटी आढळून आल्याने या दोघांचे निलंबन झाल्याचे बोलले जाते , मात्र याला याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
एक ते दीड महिन्यांपूर्वी बीडच्या कारागृहाचा पदभार एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्यांकडे काही दिवसांसाठी सोपविण्यात आला होता.या कालावधीमध्ये कारागृह महासंचालक कार्यालयातील एक पथक बीडच्या कारागृहाची तपासणी करण्यासाठी अचानक आले होते.यावेळी कैद्याच्या नातेवाईकांऐवजी भलेतच लोक भेटत असल्याचे समोर आले.एवढेच नव्हे तर काही गंभीर त्रुटी देखील आढळून आल्यामुळे वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि कारागृहातील महिला शिपाई यांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे.दरम्यान कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे होणारे हे निलंबन मागच्या अनेक वर्षातील पहिलीच घटना मानली जात आहे.
---
तात्पुरता पदभार आला अंगलट
रमजानच्या महिन्यात एका वरिष्ठ तुरुंग अधिकारी यांच्याकडे बीडच्या कारागृहाचा पदभार आला होता.यावेळी कारागृह महासंचालक कार्यालयातील एक पथक अचानक बीडला आल्यानंतर काही त्रुटी समोर आल्या अन यामुळे वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि एका महिला शिपाईचे निलंबन झाल्याच्या चर्चा आहेत.त्यामुळे बीडचा पदभार त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा आहे.

बातमी शेअर करा