Advertisement

अजित पवारांचा ताफा अडवला

प्रजापत्र | Saturday, 26/04/2025
बातमी शेअर करा

 परभणी: एक रुपयात पिक विमा योजनेला (Ajit Pawar) शेतकऱ्यांनी चुना लावला,असा आरोप करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या परभणी दौऱ्यात किसान सभा आणि युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा येत असताना अचानक आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. सोबत आणलेल्या चून्याच्या डब्या अजित पवारांच्या वाहनांच्या ताब्यावर फेकत विधानाचा निषेध केला.

 
           युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. आंदोलकांना ताब्यात घेत पोलिसांनी अजित पवारांच्या ताफ्याला मार्ग करून दिला. या प्रकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान (Ajit Pawar) अजित पवारांच्या वाहनांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना नवा मोंढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

Advertisement

Advertisement