बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात (Crime)शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली. मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणण्याचे आमिष दाखवून एका नामांकित शाळेतील दोन शिक्षकांनी महिला पालकावर वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेने मलकापूर शहर (Police)पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या घटनेने परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपी शिक्षकांविरोधात कठोर कारवाई केली जावी, अशा मागणीने जोर धरला आहे.
मलकापूर शहरातील नामांकित असलेल्या नूतन विद्यालयात हा प्रकार घडला असून समाधान इंगळे आणि अनिल थाटे, असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. समाधान इंगळे हा पीडित महिलेच्या मुलाचा वर्गशिक्षक आहे. तुमच्या मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणू. पण त्यासाठी आम्हाला खूश करावा लागेल, असे आरोपींनी पीडिताला म्हटले. त्यानंतर आरोपींनी वारंवार महिलेवर अत्याचार केला. याला वैतागून महिलेने महलकापूर शहर पोलीस ठाणे गाठून तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी (Police)दोन्ही शिक्षकांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक केली. पोलिसांनी आरोपी शिक्षकांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली. आरोपींनी पीडित महिलेव्यतिरिक्त आणखी कोणाला वासनेचे शिकार बनवले आहे का? याचाही पोलीस तपास करीत आहेत. या घटनेनंतर संबंधित नूतन विद्यालयात मुलांना शिकायला पाठवणाऱ्या(School) पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.