आष्टी दि.२२(पतिनिधी): ब्लॅकमेल (Ashti) व छळास कंटाळून वैष्णवी महादेव मिरड (वय २५) या विवाहित तरुणीने मिरडवाडी (ता.आष्टी, जि. बीड) येथील राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयत (Crime)विवाहितेचे वडील प्रकाश ज्योतीबा काळे (रा. हातवन) यांच्या तक्रारीवरून अंमळनेर पोलीस ठाण्यात काशीनाथ आशोक राऊत आणि साळुबा ऊर्फ आप्पा आशोक राऊत (दोघे रा. हातवन) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहितीनुसार वैष्णवी हिचे लग्न (Ashti) आधी धानोरा (ता. शेनगाव) येथील युवकासोबत झाले होते. मात्र, तिच्या गावातील काशीनाथ राऊत हा सतत तिचा पाठलाग करत होता, तिला ब्लॅकमेल करीत होता. लग्नानंतरही त्याने तिला धमकावत पळवून नेल्याचे प्रकार घडले. परिणामी तिच्या सासरच्या मंडळींनी तिला नांदवायला नकार दिला. या घटनांमुळे वैष्णवीच्या आयुष्यात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. नंतर गुपचूप पद्धतीने तिचे दुसरे लग्न मिरडवाडी येथील महादेव मिरड यांच्याशी (Crime)करण्यात आले. पण काशीनाथ राऊत यांनी तेथेही जाऊन तिला धमकावणे, बदनामी करण्याची भाषा करणे सुरूच ठेवले. इतकेच नव्हे, तर तिच्या पतीला फोन करून तिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे खोटे आरोप करत तिला सोडण्याची धमकी देण्यात आली होती. या सततच्या मानसिक छळामुळे आणि बदनामीच्या भीतीने वैष्णवीने १६ एप्रिल रोजी मिरडवाडी येथील राहत्या घरी विधारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे तिचे वडील प्रकाश काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून काशीनाथ राऊत आणि त्याचा भाऊ आप्पा राऊत या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.