Advertisement

तरुणाला ऑनलाईन गंडवले

प्रजापत्र | Tuesday, 22/04/2025
बातमी शेअर करा

बीड दि.२२(प्रतिनिधी):केज शहरातील एका तरुणाच्या व्हाट्सअँप क्रमांकावर लिंक पाठवून (दि.२१) जानेवारी २०२५ रोजी क्रेडिट कार्ड क्र.वरून अज्ञात व्यक्तीने दोन मोबाईल खरेदी करून ८२,३०३ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकारणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  केज(kaij) शहरातील रहिवाशी निलेश सुभाष राऊत (वय २४) रा.क्रांती नगर केज यांच्या व्हाट्सअँप वर अज्ञाताने एक लिंक पाठवून क्रेडिट कार्ड क्र. यावरून अज्ञात व्यक्तीने दोन मोबाईल खरेदी करून ८२,३०३ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकारणी(Crime) निलेश राऊत यांच्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात (दि.२१) सोमवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करत आहेत. 
 

Advertisement

Advertisement