Advertisement

डॉ.वळसंगकरांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण

प्रजापत्र | Sunday, 20/04/2025
बातमी शेअर करा

सोलापूर : सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजीशियन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr.Shirish Valsangkar Suicide Case)  यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या महिलेला डॉ.वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने तिला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

         

 

अश्विन शिरीष वळसंगकर( रा. एस. पी. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस, वळसंगकर हॉस्पिटल, सोलापूर) यांनी सदर बझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती, त्यानुसार मनीषा महेश मुसळे ऊर्फ मनीषा माने (रा. सोलापूर Solapur) या संशयित महिलेला अटक करण्यात आली आहे. तिला पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

मनीषा मुसळे-माने ही महिला डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होती. डॉ. अश्विन वळसंगकर यांच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी महिला मनीषा मुसळे-माने ही खोटे आरोप करून धमकी देत होती. डॉ. वळसंगकर हे हॉस्पिटलमधील (Hospital) व्यवहारांमध्ये पारदर्शतेसाठी आग्रही होते. सर्व व्यवहार हे कागदोपत्री व्हावेत, यासाठी ते ठाम असायचे. (Suicide Case)  पण, रुग्णांकडून घेतलेल्या पैशाची काही कर्मचारी नोंद ठेवत नव्हते, असे सांगितले जात आहे.कागदोपत्री नोंद न ठेवता पैसे स्वीकारण्यास डॉ. वळसंगकर यांचा तीव्र आक्षेप होता. त्यामुळे संबंधित महिलेला कामावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर संबंधित महिलेने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. या महिलेच्या त्रासाला कंटाळूनच डॉ शिरीष वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली हेाती. मनीषा माने उर्फ मनीषा मुसळे हिच्यामुळे डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली, असे तक्रारीत डॉ. अश्विन वळसंगकर यांनी म्हटले आहे.

सोलापूर शहरातील सदर बझार पोलिस ठाण्यात डाॅ. अश्विन शिरिष वळसंगकर यांनी फिर्याद दिली हेाती. त्यानुसार मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आली. तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आले. न्यायालयात मनीषा मुसळे-माने हिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या चौकशीतून यातील अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement