Advertisement

चोरट्यांनी मारला सौर ऊर्जेच्या प्लेटांवर डल्ला

प्रजापत्र | Sunday, 20/04/2025
बातमी शेअर करा

 बीड दि.२० (प्रतिनिधी):तालुक्यातील(Beed) रुई शहाजानपूर शिवारातून शेतातील विहिरीवर व बोरवर असलेल्या सौर ऊर्जेच्या पेल्टा अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना (दि.१६) बुधवार रोजी रात्री घडली असून १,५६,००० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याप्रकरणी बीड(Beed police) ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

            जिल्हाभरात चोरीच्या घटनेत वाढ होताना दिसत (Criem news)आहे.अश्यातच विनायक बाबुराव शहाने (वय ५०) रा.पांगरी ता.जी बीड यांच्या रुई शहाजानपूर शिवारातून शेतातील विहिरीवर व बोरवर बसवलेल्या  सौरऊर्जेच्या बारा पेल्टा अज्ञात चोरटयांनी लंपास केल्या.  सौरऊर्जेच्या १२ पेल्टा प्रत्येकी पेल्ट किंमत अंदाजे १३,००० रुपये प्रमाणे असा एकूण १,५६,००० हजारांचा मुद्देमाल लंपास केला. विनायक शहाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून (दि.१९) शनिवार रोजी बीड(Beed gramain police) ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पोलीस करत आहेत. 

Advertisement

Advertisement